info@rajevikramsinhghatgefoundation.com

फाऊंडेशनबद्दल

लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपत स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण जीवन कागल, गडहिंग्लज व उत्तूरवासियांसाठी समर्पित केले. आपल्या प्रत्येक सहकारी संस्थेला शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांनी नवा आदर्श जपला. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे कार्य पुढे नेण्याच्या हेतूने लोकहिताची कामे करणे व त्यातून समाजहित जपणे हा एकमेव उद्देश घेऊन ९ ऑगस्ट २०१७ रोजी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती व वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करत आहे.

पाणी व आरोग्य या मानवी जीवनातील मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या अन्य योजना राबविल्या जात आहेत. निरोगी व सशक्त समाज हा विकासाचा पाया आहे. यासाठी सर्व समाजघटकांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. याच विचाराने विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य केंद्रे चालविली जात आहेत.

अधिक पहा

उद्दिष्टे

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारसा व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे जनकार्य पुढे नेण्यासाठी हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात अविरत कार्यरत आहे.

अधिक पहा

आमचे प्रेरणास्थान

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज स्व. राजे विक्रमसिंह घाटगे म्हणजे सहकार क्षेत्रातील आदर्श नेतृत्व. आपले संपूर्ण जीवन त्यांनी कागलवासियांसाठी समर्पित केले. कागलवासीयांमध्ये त्यांच्याविषयी अमाप आदर व प्रेम आहे. साखर कारखाने, शाळा, बँक या व यासारख्या विविध माध्यमातून गरजू लोकांना स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सदैव मदतीचा हात दिला. नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्यासाठी एक भक्कम आधार बनून त्यांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहत असत. छत्रपती शाहू महाराजांच्या जनक भूमीत, कागलमध्ये त्यांच्या विचारांचे एक उचित स्मारक व्हावे, या विचाराने त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे साखर कारखाना उभा केला.

उभ्या केलेल्या सर्व सहकारी संस्थांना शाहू महाराजांचे नाव देऊन
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी नवा आदर्श जपला. अथक परिश्रम, पारदर्शी कारभार, योग्य नियोजन, काटकसर, 'मी या संस्थांचा विश्वस्थ आहे' ही भावना या पंचसूत्रीच्या जोरावर त्यांनी आपल्या सर्व संस्था आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवल्या.
एक संकल्प...
लोकसहभाग व लोकचळवळीतून संपूर्ण कागल तालुक्याचा आणि प्रामुख्याने ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा

विविध कामांमधून समाजहित जपत असताना फाऊंडेशनला काही सेवाभावी संस्था, खासगी संस्था आणि विशेषकरून समाजसेवी संस्थांचा मोठा हातभार लागला आहे. यामुळेच फाऊंडेशनचे काम प्रभावीपणे सुरू आहे. यापुढील काळातही फाऊंडेशनच्या माध्यमातून लोक हिताची व लोकोपयोगी कामे करावयाची योजना असून या कामासाठी आपल्याकडून मिळणारे सर्व प्रकारचे साहाय्य नेहमीच स्वागतार्ह आहे.देणगी द्या

छायाचित्रे

फाऊंडेशनची कार्ये व फाऊंडेशनतर्फे घेतल्या जाणार्‍या उपक्रमांवर या फोटो गॅलरीच्या माध्यमातून एक नजर टाका...


अधिक पहा

कार्यक्रम

फाऊंडेशनच्या कामांतर्गत राबविले गेलेले काही उपक्रम व विविध कार्यक्रमांची झलक आपण येथे पाहू शकता...

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली गेली.

अधिक वाचा
जलयुक्त शिवार योजना

पावसाचे पाणी वाया न जाऊ देता जर योग्यरित्या साठविले गेले तर पिण्याच्या व शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. पाणी वाचवणे, पाण्याचे पुनर्भरण करणे...

अधिक वाचा
कौशल्य विकास कार्यक्रम

सशक्त समाज घडविण्यासाठी तरुण वर्ग सक्षम असणे अतिशय महत्वाचे असते. बेरोजगारी हा तरुणांपुढचा एक प्रमुख प्रश्न. बेरोजगारीशी लढा देण्यासाठी तरुणांना शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य कामांचे प्रशिक्षण पुरविणे...

अधिक वाचा
महिला विकास विविध कल्याणकारी योजना

स्त्रियांनी शिकावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, सक्षम व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे विविध महिला विकास विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

अधिक वाचा

अधिक पहा

अध्यक्ष व संचालक मंडळ

राजे विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र, शाहू ग्रुप व म्हाडा पुणे चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे या फाऊंडेशनचे अध्यक्षपद सांभाळत असून त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत.

अधिक पहा