info@rajevikramsinhghatgefoundation.com

आरोग्य कार्यक्रम

आरोग्य कार्यक्रम

निरोगी व आरोग्यपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी फाऊंडेशन विविध आरोग्य कार्यक्रम राबवित आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाज घटकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सोयी व उपचार सहज उपलब्ध व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या उपक्रमांमध्ये वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी यांसारखी विविध वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबीरे, महिलांसाठी कॅन्सरसारख्या आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मार्गदर्शन कार्यक्रमांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे, आरोग्य राखणारे योगासन प्राणायाम सूर्यनमस्कार साधना इत्यादी योग साधनेचे उपक्रम राबवणे असे अनेक उपक्रम समाविष्ट आहेत.