info@rajevikramsinhghatgefoundation.com

सुदृढ आरोग्य, सशक्त समाज

सुदृढ आरोग्य, सशक्त समाज

नागरिकांचे आरोग्य जपले जावे व त्याद्वारे निरोगी आणि सशक्त समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने फाऊंडेशनतर्फे विविध आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. आर्थिक दुर्बल घटकांना या शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी व उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत.

फाऊंडेशनतर्फे नागरिकांसाठी विविध वैद्यकीय शिबिरे घेतली जात आहेत, ज्यामध्ये आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी यांसारखी शिबिरे घेतली जातात. विशेषतः महिलांचे आरोग्य जपले जावे यासाठी कॅन्सरसारख्या आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मार्गदर्शन कार्यक्रमांचे मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित केले जातात. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार साधना इत्यादी उपक्रमही नियमितपणे राबविले जात आहेत.