info@rajevikramsinhghatgefoundation.com

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली गेली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना MPSC/UPSC, बँकिंग यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली गेली. या परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे तंत्र कसे आत्मसात करावे इ. गोष्टीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे हा या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, इत्यादी संलग्न त्या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पीएसआय एसटीआय पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा, ‌‌‌तलाठी लिपिक-टंकलेखक, पोलीस भरती, सरळ सेवा भरती अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा, एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध टेक्निकल परीक्षांच्या सामान्य अध्ययनाचा भाग, महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा,‌‌‌‌‌ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा अशा विविध स्पर्धांची तयारी येथे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते.