info@rajevikramsinhghatgefoundation.com

जलयुक्त शिवार योजना

जलयुक्त शिवार योजना

पावसाचे पाणी वाया न जाऊ देता जर योग्यरित्या साठविले गेले तर पिण्याच्या व शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. पाणी वाचवणे, पाण्याचे पुनर्भरण करणे व पाण्याच्या साठ्यांचे संधारण करणे यांद्वारे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.

कागलभूमी जलसमृद्ध व्हावी यासाठी फाऊंडेशन विविध मार्गांचा अवलंब करत आहे. यामध्ये जलयुक्त शिवार योजनेविषयी प्रबोधन करणे, पाणी अडवा पाणी जिरवा, ठिबक सिंचन योजना, विहीर खुदाई योजना, बंधारे घालणे, जलाशयांमधून गाळ काढणे, जलाशयांची पानी साठविण्याची क्षमता वाढविणे, शेत तळी बांधणे अशी अनेक कामे जनसहभागातून पूर्ण केली जातात.