info@rajevikramsinhghatgefoundation.com

कौशल्य विकास कार्यक्रम

कौशल्य विकास कार्यक्रम

सशक्त समाज घडविण्यासाठी तरुण वर्ग सक्षम असणे अतिशय महत्वाचे असते. बेरोजगारी हा तरुणांपुढचा एक प्रमुख प्रश्न. बेरोजगारीशी लढा देण्यासाठी तरुणांना शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य कामांचे प्रशिक्षण पुरविणे व त्याद्वारे युवा वर्गास सक्षम बनविणे यासाठी फाऊंडेशन काम करीत आहे.

रोजगाराभिमुख कौशल्यकामांचे प्रशिक्षण देणारे उपक्रम फाऊंडेशनतर्फे घेतले जातात. यामध्ये प्लंबिंग, गवंडीकाम, सुतारकाम, वायरमन यांसारख्या विविध कामांचे प्रशिक्षण तरुणांना दिले जात आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्र, शिबीरे भरविणे यांचा तरुण वर्गाला मोठा लाभ मिळत आहे.