महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे अत्यंत महत्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे या उद्देशाने राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन विविध योजना राबवत आहे.
महिलांमधे आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी म्हणून आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, स्त्रियांना शिक्षण, प्रशिक्षणाच्या संधी देण्याची निरनिराळी कामे फाऊंडेशनमार्फत केली जातात. घरगुती व्यवसाय, तसेच लघुउद्योग उदा. विणकाम, शिलाई काम इत्यादीचे मार्गदर्शन करणे, पापड, लोणची, शेवया अशा विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास प्रोत्साहन देत त्याला योग्य बाजारपेठही मिळवून देण्यासाठी फाऊंडेशन कार्यरत आहे.
महिलांनी स्वावलंबी व्हावे म्हणून बचतगट तयार करावा यासाठी फाऊंडेशनकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. महिलांच्या कलागुणांना वाव देऊन महिलांचा सर्वांगीण विकास साधणे यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन नेहमी प्रयत्नशील आहे.