स्त्रियांनी शिकावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, सक्षम व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे विविध महिला विकास विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होता यावे यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.
महिला व मुलींसाठी शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम फाऊंडेशनतर्फे जोमाने केले जाते. महिलांना अर्थार्जनासाठी विविध घरगुती उद्योग व व्यवसायांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारे कार्यक्रम, शिबिरे फाऊंडेशनतर्फे चालविली जातात. यामध्ये पापड, लोणची, शेवया यांसारखी खाद्य उत्पादने बनविणे, विणकाम, शिलाईकाम इत्यादी कामांचे मार्गदर्शन करणे व प्रशिक्षण पुरविणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र यावे, स्वावलंबी व्हावे यासाठी फाऊंडेशन प्रयत्न करत आहे.