सैनिक म्हणजे देशाचे रक्षणकर्ते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी विविध कार्यक्रम, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अन्य कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी साहाय्य करणे इत्यादी कार्यक्रम फाऊंडेशन राबवित आहे.