info@rajevikramsinhghatgefoundation.com

समाज कल्याण, तत्पर सहकार्य

समाज कल्याण, तत्पर सहकार्य

समाजाची सशक्त जडणघडण व्हावी यासाठी फाऊंडेशन नियमितपणे प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्यांवर उपाययोजना करणे यासाठी फाऊंडेशन विविध मार्गाने प्रयत्न करत आहे.

फाऊंडेशनतर्फे समाज कल्याणाच्या विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व अन्य उपक्रम राबविले जातात. यामधून नागरिकांना एकत्र आणले जाते, नागरिकांचे प्रबोधन केले जाते, समस्यांवर मार्गदर्शन व उपाय केले जातात तसेच सामाजिक सलोखाही जपला जात आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी यांविषयी समाज प्रबोधन करणे, डॉल्बी मुक्ती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम चालविणे, गरजू, आर्थिक दुर्बल, वंचित समाज घटकांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास साहाय्य करणे, अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करणे तसेच शासकीय मदत मिळवून देण्यास साहाय्य करणे, यांसारखे उपक्रम फाऊंडेशन नियमित चालवीत आहे.