info@rajevikramsinhghatgefoundation.com

सामाजिक कल्याणकारी योजना

सामाजिक कल्याणकारी योजना

नागरिकांच्या पाणी, शिक्षण, रोजगार यांसारख्या समस्यांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न फाऊंडेशनकडून नियमितपणे केला जात आहेच, त्याचबरोबर सामाजिक कल्याण राखले जाईल अशा अन्य योजनाही फाऊंडेशनतर्फे राबविल्या जात आहेत.

सामाजिक सलोखा जपला जावा, विविध मार्गांनी समाजाचे प्रबोधन व्हावे व समाजमान उंचावले जावे यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी यांविषयी समाज प्रबोधन करणे, डॉल्बी मुक्ती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम चालविणे, गरजू, आर्थिक दुर्बल, वंचित समाज घटकांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास साहाय्य करणे, अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करणे तसेच शासकीय मदत मिळवून देण्यास साहाय्य करणे, यांसारखे उपक्रम फाऊंडेशन नियमित चालवीत आहे.