info@rajevikramsinhghatgefoundation.com

आजचे शिक्षण, उद्याचा समाज

आजचे शिक्षण, उद्याचा समाज

शिक्षण हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याने सर्व समाज घटकांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शिक्षणाचे महत्व ओळखून, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून फाऊंडेशन अनेक उपक्रम राबवते. शाळकरी मुलांना शालेय वस्तूंचे उदा. दप्तर, वह्या इ. वाटप केले जाते. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते.

ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व पोहोचवणे व प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे यासाठी देखील फाऊंडेशनतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महिलांनी शिक्षण घेणे महत्वाचे आहे हे पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम फाऊंडेशन करते. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्‍या तरुणांसाठी परीक्षांची तयारी कशी करावी, त्यांचा अभ्यास सुकर व्हावा व वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारली गेली आहेत.