info@rajevikramsinhghatgefoundation.com

जलसमृद्ध भूमी, संपन्न शेती

जलसमृद्ध भूमी, संपन्न शेती

कागल, गडहिंग्लज व उत्तूर परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवू नये, पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी व उद्योगांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फाऊंडेशन कार्यरत आहे. येथील शेती सर्व प्रकारे संपन्न व्हावी व शेती उत्पादनांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा फाऊंडेशनचा उद्देश आहे.

पुरेसे पाणी उपलब्ध होणे ही शेतीची प्राथमिक गरज असते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कागल, गडहिंग्लज व उत्तूर मधील शेती जलसमृद्ध व्हावी, सर्वांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, भविष्यात कोणालाही पाण्याची अडचण भासू नये या उद्देशाने फाऊंडेशन काम करत आहे.

जलयुक्त शिवार योजनेविषयी प्रबोधन करणे, पाणी अडवा पाणी जिरवा, ठिबक सिंचन योजना, विहीर खुदाई योजना, बंधारे घालणे, जलाशयांमधून गाळ काढणे, जलाशयांची पाणी साठविण्याची क्षमता वाढविणे, शेत तळी बांधणे अशी अनेक कामे जनसहभागातून पूर्ण केली जातात.