info@rajevikramsinhghatgefoundation.com

कौशल्य विकास, रोजगाराला आधार

कौशल्य विकास, रोजगाराला आधार

तरुण वर्गाच्या प्रमुख गरजांपैकी एक म्हणजे रोजगार. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी फाऊंडेशनतर्फे किमान कौशल्यविकास मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना व्यवसाय व त्यातून अर्थार्जनाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा फाऊंडेशनचा उद्देश आहे.

तरुणांनी चांगले शिक्षण घ्यावे, सुशिक्षित व्हावे यासाठी फाऊंडेशनतर्फे प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणाबरोबरच तरुणांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. नोकरी बरोबरच तरुणांनी रोजगाराचे विविध पर्याय अवलंबावेत यासाठी फाऊंडेशनतर्फे मार्गदर्शन दिले जाते. यासाठी विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमही येथे राबविले जातात. प्लंबिंग, गवंडीकाम, सुतारकाम, वायरमन यांसारख्या विविध कामांचे प्रशिक्षण तरुणांना दिले जात आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्र, शिबीरे भरविणे यांचा तरुण वर्गाला मोठा लाभ मिळत आहे.